!! शासनाची बाल संगोपन योजना 2022 !!
शासनाची बाल संगोपन योजना ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील व ज्या मुलांना आई व वडील दोन्ही ही नसतील अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळतो. वय वर्षे ० ते १८ वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना ही लाभ दिला जातो. एका मुलांसाठी रुपये ११०० रुपये प्रतिमहिना ( एका वर्षाला रुपये १३,२००) मिळतात वय १८ पुर्ण होई पर्यत दर महिन्याला रक्कम मिळते. आवश्यक कागदपत्रे :- १) योजने साठी करावयाचा अर्ज व अर्जा सोबत २) आधार कार्ड च्या झेराँक्स पालकांचे व बालकांचे ३) शाळेचे बोनाफाईड सर्टफिकेट ४) तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला. ५) पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र .(मृत्युचा दाखला) ६) पालकाचा रहिवासी दाखला. ७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स. ८) मृत्यूचा अहवाल. ९) रेशन कार्ड झेराँक्स . १०) घरा समोर पालका सोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा फोटो ( प्रत्येक मुलासोबत पालकाचा शेफरेट फोटो ) १०) मुलांचे पासपोर्ट फोटो 2 ११) पालकाचे पासपोर्ट फोटो सदर सर्व कागद पत्रांची पुर्तता करुन अर्ज करता येतो.