Latest Posts & Updates
Fresh stories, announcements and offers about Central Government Office, straight from our business.
!! ऍडमिशन घेताय तर दिलेली कागदपत्रे तयार ठेवा !!
!! ITR RETURN F.Y.2023-24 - आयकर विवरण (आयटीआर) आर्थिक वर्ष २०२३-२४ !!
!! कंपनी रेजिस्ट्रेशन ट्रस्ट रेजिस्ट्रेशन करून मिळेल !!
!! आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यास ₹२.५ लाख अर्थसहाय्य - महाराष्ट्र राज्य !!
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन या स्वायत्त संस्थेच्या वतीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी सन २०१४-१५ पासून प्रायाेगिक तत्त्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना ही नवी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यास २ लाख ५० हजार रुपयांची मदत अनुदान म्हणून दिली जाणार आहे. योजनेच्या अटी व पात्रता निकष : ०१. नवविवाहितांपैकी एक जण अनुसूचित जाती व एक जण अनुसूचित जाती सोडून इतर प्रवर्गातील असलेल्या नवदांपत्यास या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. ०२. हिंदू विवाह कायदा १९५५ अंतर्गत नोंदणीकृत विवाह केलेल्या दांपत्यासच फक्त योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. ( इतर धर्मासाठी धर्म प्रमाणपत्र असावे ) ०३. हा विवाह कायद्यानुसार वैध असावा आणि हिंदू विवाह कायदा, 1955 अंतर्गत रीतसर नोंदणीकृत असावा अशे बंधन आहे.त्यांचे कायदेशीररित्या विवाहित आणि वैवाहिक संबंध असल्याचे प्रतिज्ञापत्र जोडप्याद्वारे सादर केले जाईल. ०४. फक्त पहिल्या विवाहासाठी हे अनुदान असणार आहे. ०५. दांपत्यापैकी जर एकाचा दुसरा विवाह असेल, तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ०६. अर्जदार दांपत्याचे दोघांचे मिळून ५ लाखांपर्यंत उत्पन्न असण्याची अट आहे. ०७. अर्जदार दापत्याने आंतरजातीय विवाह केल्यापासून एका वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक राहील. एक वर्षा पेक्षा पुढील कालावधी तील अर्ज ग्राह्य धरण्यात येत नाही.
!! बांधकाम कामगार नोंदणी !!
पात्रता :- मागील १२ महिन्यांमध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले १८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगार. आवश्यक कागदपत्रे :- ०१. वयाचा पुरावा ०२. रहिवासी पुरावा ०३. आधार कार्ड ०४. ३ फोटो ०५. बँक पासबुक ०६. ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार सर्टिफिकेट.
नमस्कार🙏🏻
दिनांक ०९ डिसेंबर २०२२ रोजी चेंबूर कॅम्प इंदिरा नगर व बेरेक मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभाग सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या सहकार्याने "अपनालय एनजीओ-APANALAY NGO" मार्फत गरोदर महिलांना देण्यात येणाऱ्या सुविधा व त्यांची कश्या प्रकारे काळजी घ्यावी त्याबद्दल मार्गदर्शन तसेच जनजागृती करण्याकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले. गरोदर महिलांना खालील प्रकारची जनजागृती तसेच मार्गदर्शन केले गेले :- - आरोग्य तपासणी - गरोदरमहिलांचे धनुर्वातविरोधी लसीकरण - संदर्भ सेवा - पुरक पोषण आहार - पोषण आणि आरोग्य शिक्षण - लसीकरण गरोदर महिलांना खालील योजनांबद्दल मार्गदर्शन केले गेले :- -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना -ई-श्रम योजना -संजय गांधी निराधार योजना प्रमुख उपस्थिती :- -डॉ. राजेंद्र सकट सर (समाज विकास अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभाग) -आबिदा मॅडम (अपनालय एनजीओ-APANALAY NGO) -दिनेश मारू सर (आरोग्य समन्वयक अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभाग) -किरण पाटील सर (जनता सेवा केंद्र) -प्राची विजय राजपाल मॅडम (महिला अध्यक्ष) -लीना सुतार मॅडम (कृपा महिला सेवाभावी संस्था) -बृहन्मुंबई महानगरपालिका एम पश्चिम आरोग्य विभाग धन्यवाद !! जनता सेवा केंद्र !! !! किरण पाटील अँड कंपनी !! कॉमन सर्व्हिस सेन्टर, चेंबूर, CSC E-Governance Services India Limited
!! शासनाची बाल संगोपन योजना 2022 !!
शासनाची बाल संगोपन योजना ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील व ज्या मुलांना आई व वडील दोन्ही ही नसतील अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळतो. वय वर्षे ० ते १८ वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना ही लाभ दिला जातो. एका मुलांसाठी रुपये ११०० रुपये प्रतिमहिना ( एका वर्षाला रुपये १३,२००) मिळतात वय १८ पुर्ण होई पर्यत दर महिन्याला रक्कम मिळते. आवश्यक कागदपत्रे :- १) योजने साठी करावयाचा अर्ज व अर्जा सोबत २) आधार कार्ड च्या झेराँक्स पालकांचे व बालकांचे ३) शाळेचे बोनाफाईड सर्टफिकेट ४) तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला. ५) पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र .(मृत्युचा दाखला) ६) पालकाचा रहिवासी दाखला. ७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स. ८) मृत्यूचा अहवाल. ९) रेशन कार्ड झेराँक्स . १०) घरा समोर पालका सोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा फोटो ( प्रत्येक मुलासोबत पालकाचा शेफरेट फोटो ) १०) मुलांचे पासपोर्ट फोटो 2 ११) पालकाचे पासपोर्ट फोटो सदर सर्व कागद पत्रांची पुर्तता करुन अर्ज करता येतो.
सानुग्रह अनुदान योजना
Common Services Centers are a strategic cornerstone of the Digital India Programme. They are the…
Common Services Centers are a strategic cornerstone of the Digital India Programme. They are the front-end delivery points for G2C, B2C & social services.
You’ve reached the end of these updates.