Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Central Government Office, straight from our business.

!! महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण योजना !!

👉🏻आपल्या जनता सेवा केंद्रामार्फत अर्ज करून मिळेल ➡️ खालील विभागाची भेट घेऊन योजनेबद्दल मिळालेली सविस्तर माहिती - महाराष्ट्र मुख्यालय: महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन मुंबई - मुंबई विभाग: कामगार भवन महाराष्ट्र शासन बांद्रा मुंबई ➡️ योजनेचा उद्देश: नोंदीत घरेलू कामगारांना घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देणे ➡️ सध्या मिळत असणाऱ्या लाभाचे स्वरूप: - अंत्यविधी लाभ: मृत घरेलू कामगारांच्या कायदेशीर वारसास अंत्यविधी सहाय्य - रु.२,०००/- - प्रसूती लाभ: घरेलू कामगारास दोन अपत्यांपर्यंत प्रत्येक प्रसूतीकरिता मदत - रु.५,०००/- - सन्मानधन योजना: (वयोमर्यादा ५५ ते ६० वर्षे) - रु.१०,०००/-

!! महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण योजना !! post imageRead full post

!! समाधान शिबीर - जिल्हाधिकारी मुंबई शहर !!

दिनांक १०.०४.२०२६ रोजी सकाळी १० वाजता लोअर परेल येथे महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी मुंबई शहर मार्फत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात शहरातील नागरिकांनी मोठा प्रमाणात सहभाग घेतला - 👉🏻सदर शिबिरात आपले मित्र माननीय नायब तहसीलदार सरांनी मुबई शहर जिल्हाधिकारी आणि त्याची संपूर्ण टीम यांची भेट घडवून दिली शिवाय मुंबई शहरातील सर्व विभागातील तलाठी अधिकाऱ्यांसोबत आपली वैयक्तिक बैठक घडवून मुंबई शहर सरकारी कामाबद्दल मार्गदर्शन सुद्धा केले त्याबद्दल सरांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. 👉🏻शिबिरात राबविल्या गेलेल्या नागरी सेवा: * उत्पन्न दाखला * रहिवाशी दाखला / अधिवास दाखला * संजय गांधी योजना / इतर योजना * नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र * जेष्ठ नागरिक * जात प्रमाणपत्र / जात पडताळणी * जमीन महसूल रेकॉर्ड / इतर * मुंबई शहर तहसीलदार संदर्भातील इतर सेवा.

!! समाधान शिबीर - जिल्हाधिकारी मुंबई शहर !! post imageRead full post

!! पटपडताळणी (Student Verification)!!

पटपडताळणी (Student Verification) म्हणजे शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी आणि त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती यांची शासकीय स्तरावर केली जाणारी तपासणी होय. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत ही प्रक्रिया राबवली जाते. - २०२६ मधील पटपडताळणी मोहिमेचे वेळापत्रक: - ११ एप्रिल २०२६ - १५ एप्रिल २०२६ - २२ एप्रिल २०२६

!! पटपडताळणी (Student Verification)!! post imageRead full post

!! MHT CET 2026 परीक्षेचे प्रवेशपत्र !!

👉महाराष्ट्र राज्य CET सेलने MHT CET 2026 परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. - पीसीएम ग्रुप (PCM) परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध: ०५ ऑगस्ट २०२६. - परीक्षा तारीख: ११ ते १९ एप्रिल २०२६ 👉तुमच्या भविष्याची पहिली पायरी .. तयारी करा यश नक्की तुमचे !

!! MHT CET 2026 परीक्षेचे प्रवेशपत्र !! post imageRead full post

!! RTE (शिक्षणाचा अधिकार) पहिली निवड यादी !!

महाराष्ट्र आरटीई (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी केलेल्या अर्जाची पहिली निवड यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे: * अर्ज निवड झालेली पहिली यादी तारीख: ६ एप्रिल २०२६ सकाळी ११.०० वाजता. * सोडत ठिकाण: महात्मा फुले सभागृह पुणे * स्वागत समारंभ: पुणे येथील जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १० मुलांना सोडत दिनी बोलावून त्या मुलांचे स्वागत गोष्टीची पुस्तक, पेन आणि चॉकलेट भेट देऊन करणार.

!! RTE (शिक्षणाचा अधिकार) पहिली निवड यादी !! post imageRead full post

!! NGO - स्वयंसेवी संस्था नोंदणी !!

NGO - स्वयंसेवी संस्था मार्गदर्शन आणि नोंदणी करून मिळेल. 👉NGO - स्वयंसेवी संस्था: - ट्रस्ट नोंदणी (निस्वार्थीपणे समाजसेवा करण्यासाठी नोंदणी) - सोसायटी नोंदणी (निस्वार्थीपणे समाजसेवा करण्यासाठी नोंदणी) - सहकारी संस्था नोंदणी (स्वतःचा व्यवसाय किंवा आर्थिक प्रगती करण्यासाठी नोंदणी) - बचत गट नोंदणी (छोटी बचत करून त्यातून गटाला सहकार्य करण्यासाठी नोंदणी) 👉लागणारी माहिती: - संस्थेच नाव - संस्थेचे उद्दिष्ठ - सदस्य संख्या (नोंदणी नुसार) - सदस्य माहिती (फोटो, आधार , पॅन , मोबाईल , ई-मेल ) - सदस्य पद शिक्षण व्यवसाय माहिती - संस्थेच ऑफिस पत्ता माहिती सोबत पुरावा करारनामा - आवश्यक कागदपत्रे , उपनियम, बँक प्रमाणपत्र , ना हरकत प्रमाणपत्रे , स्टॅम्प पेपर , नोटीस , प्रस्ताव, ठराव , सभासद रजिस्टर , इतर आवश्यक

!! NGO - स्वयंसेवी संस्था नोंदणी !! post imageRead full post

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इ-केवायसी मुदतवाढ !!

मुदतवाढ : ३० एप्रिल २०२६ आपल्या माहितीकरिता : - राज्यातील एकूण अर्जदारापैकी अंदाजे ७० लाख ते ९० लाख लाभार्थ्यांना योजनेतून अपात्र केलं गेलेलं आहे. - ज्या बहिणींनी ३१ डिसेंबर २०२५ च्या अगोदर इ-केवायसी केलेली नाही अश्या सर्वच बहिणींना अपात्र केले गेलेलं आहे - ज्या बहिणींकडून इ-केवायसी करताना चूक झाली असेल त्यांना आता एक महिना मुदतवाढ दिलेली आहे.

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इ-केवायसी मुदतवाढ !! post imageRead full post

!! १ एप्रिलपासून आर्थिक व्यवहार नियम बदल !!

एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरू होणार असून अनेक नियम देखील बदलणार आहेत. बँकिंग, कर, गॅस, प्रवास आणि दैनंदिन खर्चाशी संबंधित नियम बदलतील. यामुळे तुम्हाला या बदलांची माहिती असायला हवी. प्रमुख आर्थिक आणि नियम बदल: नवीन नियमांमुळे आर्थिक व्य्ववहार करताना नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागू शकतो.

!! १ एप्रिलपासून आर्थिक व्यवहार नियम बदल !! post imageRead full post

!! १ जानेवारी २०११ पूर्वीची अतिक्रमण नियमित होणार !!

➖➖➖➖➖ 📜राज्यातील हजारो कुटुंबांसाठी दिलासादायक निर्णय घेत शासनाने मोठा पाऊल उचलले असून सरकारी जमिनींवर १ जानेवारी २०११ पर्यंत केलेली बांधकामे आता नियमित केली जाणार आहेत. 👉 हा निर्णय मुंबई व मुंबई उपनगर वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लागू असेल 👉 काय आहे मुख्य निर्णय? * 🔸 १५०० चौ. फुटांपर्यंतचे अतिक्रमण नियमित केले जाणार * 🔸 १५०० पेक्षा जास्त अतिक्रमण थेट पाडण्यात येणार 🚧 * 🔸 ५०० चौ. फुटांपर्यंतचे घर पूर्णपणे मोफत नियमित होणार 💯 * 🔸 उर्वरित क्षेत्रासाठी बाजारमूल्याच्या फक्त १०% रक्कम आकारली जाणार 👉 कोणत्या जमिनींवर सवलत नाही? खालील ठिकाणांवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत नियमित होणार नाही ❌ * 🔸 नदीपात्र व नाले * 🔸 गायरान जमीन * 🔸 सार्वजनिक रस्ते * 🔸 वनक्षेत्र 🌳 * 🔸 स्मशानभूमी * 🔸 खेळाचे मैदान * 🔸 शाळा व रुग्णालयांसाठी आरक्षित जागा 👉 अशा कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पर्यायी घरे दिली जातील 🏠

!! १ जानेवारी २०११ पूर्वीची अतिक्रमण नियमित होणार !! post imageRead full post