!! रोजगार हमी योजना इ-केवायसी - MNREGA E-KYC !!
Published
- राज्य - संपूर्ण भारत देश
- लाभार्थी गट - ग्रामीण विभाग मजूर (जॉब कार्ड असलेले)
- विषय - रोजगार हमी योजना इ-केवायसी - MNREGA E-KYC करणे बंधनकारक अन्यथा बँकेत पैसे जमा होणार नाहीत.
- रोजगार हमी योजना माहिती - रोजगार हमी योजना (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) ही ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात किमान १०० दिवसांचा रोजगार देण्याची सरकारी योजना आहे.या योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे सार्वजनिक आणि वैयक्तिक कामे केली जातात.
- रस्ते बांधणी
- जलसंधारण आणि तलाव दुरुस्ती
- फळबाग लागवड
- सिंचन विहिरी बांधकाम
- घरकुल बांधकाम
- वृक्षारोपण
- रोजगार हमी योजना eKYC का आवश्यक आहे?
- ज्यांनी eKYC पूर्ण केली नाही, त्यांना कामाचे पैसे मिळणार नाहीत.
- त्यांचे जॉब कार्ड निष्क्रिय (Inactive) होईल
- काम मिळाले तरी पैसे जमा होणार नाहीत
- भविष्यात योजना लाभ घेता येणार नाही
- eKYC कसे करावे?
- गावातील ग्रामरोजगार सेवक किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा.